आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाची मान्यता नसलेले बोगस बीटी बियाणे विक्री करताना दोघा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई शनिवार, १८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास ‘ब्रिलीयंट’ शाळेजवळ घडली. यावेळी आरोपींकडून ७० हजार रुपयांच्या मुद्देमाल आढळला. शेखर झाडे, शुभम कासारकर, इमरान नूर मोहम्मद थेम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
राळेगाव येथील शेखर झाडे, शुभम कासारकर, इमरान थेम हे तिघेही शासनाची मान्यता नसलेले बीटी बियाणे विना परवानगी विक्री करत होते. याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांना मिळताच राळेगाव पोलिसांच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. तर इशांत घाडगे नामक ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यावेळी इमरान थेम यांच्या शेतात बीटी बियाणे सातशे रुपये पाकिटानुसार विक्री करत असल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी सायंकाळच्या सुमारास घाडगे यांनी झाडे यांच्याशी संपर्क साधून बियाण्यांची मागणी केली.
त्यानुसार शेखर झाडे आणि शुभम कासारकर दोघेही दुचाकीने बीटी बियाण्यांची पाकिट घेऊन आले होते. यावेळी सापळा रचून असलेल्या पोलिसांनी दोघांनाही दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आरसीओटी ६, असे लिहिलेले ९ नगर प्लास्टिकचे सीलबंद पाकिट किंमत ७०० रुपये प्रमाणे सहा हजार ३०० रुपये, मोबाइल, दुचाकी अंदाजे ४९ हजार, आणि २० नग पाकिट अंदाजे १४ हजार, मोबाइल, असा दोन्ही मिळून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांजणाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, पोलिस कर्मचारी गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, नीलेश राठोड, किशोर झेंडेकर, सलमान शेख, जितेंद्र चौधरी यांनी केली.
शेतात साठवून ठेवला होता माल : राळेगाव येथील इमरान थेम यांनी शेतात मान्यता प्राप्त नसलेल्या बीटी बियाण्यांची साठवणूक केली होती. सुरूवातीला दोघांना ताब्यात घेऊन शेताची पाहणी केली असता, शेतातील पोल्ट्री फॉर्म लगत बियाण्यांची पाकिटे आढळून आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.