आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाधवाणी फार्मसी महाविद्यालयात दि. १२ ते १४ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रोग्रामचे आयोजन बी फार्म प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरिता आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुळ उद्देश महाविद्यालयात प्रवेशित नविन विद्यार्थ्याच्या मनातील भिती दुर करणे तसेच महाविद्यालयातील वातावरणात शिक्षकासोबत व ईतर सिनियर विद्यार्थ्यासोबत एकरूप होवुन महाविद्यालया प्रती आवड निर्माण होणे त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत होणे व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळणे ही आहे.
यावेळी उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक सहायक प्रा. सुरज लांडगे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी इंडक्शन प्रोग्राम दरम्यान राबवण्यात येणारे विविध कार्यक्रम व प्रोग्रामचे मुळ उद्देशाबाबत सखोल माहिती दिली. प्राचार्य डॉ. अ. वि.चांदेवार यांनी इंडक्शन प्रोग्राम बाबतचे महत्व विषद केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्र मिळवण्याबाबत व महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. फार्मसी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्याचे स्वप्न साकार करण्याकरता कशा पध्दतीने अभ्यास करावा यावर मार्गदर्शन केले.
तसेच पालकांना कुठलीही तक्रार असल्यास त्यांच्याशी कुठल्याही वेळेस संपर्क करू शकता याची ग्वाही दिली. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देवुन करण्यात आले. इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत प्रथम सत्रात प्रेमदास पखाडे यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व आजचा युवक यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास यावर महाविद्यालयाचे प्रा. परेश वाधवाणी यांनी मार्गदर्शन केले. व्दितीय सत्रात प्रा. डॉ. माधुरी चन्नावार यांनी जिवन सुंदर आहे या विषयावर मार्गदर्शन केले.
अंतिम सत्रात प्रा. डॉ. सुप्रिया यादगिरवार यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग योगा आणि मेडिटेशन यावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी योगा व मेडिटेशन काय असते त्याचे शारिरिक व मानसिक जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन केले. समारोपीय सत्रात कार्यक्रमाची सांगता प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन सारिका जेस्वानी, प्राचार्य डॉ. मनिषा किटुकले, प्रा. डॉ. एम. ए. चन्नावार, डॉ. एस. आर.गावंडे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. किटुकले यांनी विद्यार्थ्यांची फार्मसी क्षेत्रात करीअर निवड करण्याबाबत कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा.इश्वरी चौधरी व इतर प्राध्यापक वृंद डॉ. अभिजीत श्रीराव, डॉ. अनिल देवाणी, डॉ. दिपक मोहाळे, प्रा. परेश वाधवाणी. प्रा. वैभव दारव्हेकर,आदिंचे सहकार्य लाभले. - कार्यक्रमात उपस्थित मान्यवर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.