आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वत्रिक निवडणुक:तीन ग्रा. पं.च्या सरपंच पदासाठी 19 नामांकन ; तिवसा तालुक्यात चार ग्रा.पं.च्या निवडणुका

तिवसाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात १८ सप्टेंबरला चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असून, नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेला आखतवाडा ग्रा. पं.मधून सरपंच पदासाठी एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने हे पद रिक्त राहिले आहे, तर उर्वरित उंबरखेड, घोटा, कवाडगव्हाण ग्रा.पं.च्या थेट सरपंच पदाच्या तीन जागांसाठी एकूण १९ नामांकन पत्र दाखल झाले आहेत. त्यामध्ये उंबरखेड ग्रा. पं.मधून सर्वाधिक ११ नामांकन पत्र दाखल झाले आहेत. त्यानंतर कवाडगव्हाण ग्रा. पं.मधून पाच, तर घोटामधून ३ उमेदवारी अर्ज सरपंच पदासाठी प्राप्त झाले आहेत.

तिवसा तालुक्यातील घोटा ग्रा. पं.चे सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. तेथील तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये जया मनोज गहुकार, गीता अनिल चव्हाण व रुपाली जगजीवन राऊत यांचा समावेश आहे. याशिवाय कवाडगव्हाण ग्रा. पं.मध्ये सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. तेथे एकूण पाच महिलांनी सरपंच पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये मोहिनी दिलीप चौधरी, प्रीती गजानन वसू, ज्योती रमेश सोमवंशी, जया विनोद चौधरी व मनीषा संदीप चौधरी यांचा समावेश आहे. उंबरखेड ग्रा. पं.च्या सरपंच पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तेथे सरपंच पदासाठी सर्वाधिक ११ नामांकन पत्र दाखल झाले. त्यामध्ये अतुल कळंबे, सोपान फाले, नरेंद्र अळसपुरे, दीपाली नितीन कळंबे, नितीन कळंबे, किशोर पांडव, मंगेश पावडे, गजानन अळसपुरे, रितेश पांडव, उमेश विघ्ने व गोपाल अळसपुरे यांचा समावेश आहे. मंगळवार, ६ सप्टेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज माघारी घेतात व किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर सरपंच व सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणूक रणधुमाळीला वेग येईल, हे मात्र निश्चित.

बातम्या आणखी आहेत...