आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाचे सेटलमेंट:तीन महिन्याचा कालावधी लोटत आला; मात्र मारेकरी सापडेना

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या वादाचे सेटलमेंट करायचे आहे म्हणून बोलावून वैभव नाईक या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर सुहास खैरकार आणि नयन सौदागर या दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना पाटीपूरा परिसरातील जयभिम चौकात घडली होती. यातील मारेकऱ्यांच्या शोधात पोलिस पथके आध्रप्रदेश, मध्य प्रदेशात गेली. मात्र तीन महिने होऊनही अद्यापही मारेकऱ्यांचा पत्ता लागला नाही.

या हत्ये प्रकरणी शुभम वासनिक वय २६ वर्ष, बंटी उर्फ रत्नदीप पटाले वय २२ वर्ष, करण तिहले वय २३ वर्ष, अर्जुन तिहले वय २२ वर्ष, रोशन उर्फ डीजे नाईक वय २५ वर्ष, प्रथम रोकडे वय २१ वर्ष, अभी कसारे वय २० वर्ष सर्व रा. जयभिम चौक, पाटीपूरा, यवतमाळ यांच्यासह अन्य तिघांवर खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे नोंद आहे.

शहरातील पाटीपूरा परिसरातील शुभम वासनिक हा त्याच्या मित्रासह शासकीय रुग्णालय परिसरात मद्यप्राशन करीत होता. यावेळी नयन सौदागर आणि वैभव नाईक यांनी शुभम वासनिक याच्यासह त्याच्या मित्र मंडळींना या ठिकाणी मद्यप्राशन करू नका, पोलिस आले तर तुमच्या बरोबर आम्हाला पण त्रास होईल, असे म्हटले. त्यावेळी बंटी, रोशन उर्फ डिजे नाईक, करण, अर्जुन आदींनी नयन याला शिविगाळ करीत आमच्या मधात कशाला येतो, म्हणून मारहाण केली. त्यानंतर या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी जयभिम चौकात बोलावले होते.

बातम्या आणखी आहेत...