आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांना अटक:व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील तिघांना अटक

महागाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराणा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दहा लाखाची रोख लंपास करणाऱ्या सात दरोडेखोरांपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी, तीन मोबाइलसह ३ लाख ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. शनिवार, दि. १९ ऑगस्टला यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख उपस्थित होते.

महागाव येथील किराणा व्यापारी अनिल गंभीर शर्मा हे माहूरसह सारखणी व वाई बाजार येथून वसुली करून दि. १७ ऑगस्टला महागावकडे परत येत होते.

नावाबाबात कमालीची गोपनियता
व्यापाऱ्याला दहा लाखाने लुटणाऱ्या दरोडेखोरांचे प्रकरण गंभीर आहे. त्यामूळे पोलिसांकडून दरोडेखोरांच्या नावाबाबात कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ या प्रकरणावर स्वत: लक्ष ठेवून असल्याने काही घटनांबरोबरच इतर काही घटनांही समोर येणार असल्याची चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...