आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यवतमाळ:कुलर ठरला जीवघेणा; शॉक लागुन तीन सख्या बहिणीचा जागीच मृत्यू

राळेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राळेगाव तालुक्यातील कोधुर्ली येथील दुर्दैवी घटना

राळेगाव तालुक्यातील कोधुर्ली येथील गजानन भुसेवार यांच्या संख्या तीन मुलीचा घरातील कुलरचा शॉक लागुन जागीच मृत्यू झाल्याची घटना 30 जुलै रोजी सकाळी घडली.

तीनही सख्या बहिणीचे आई वडील शेतात गेले असताना रिया गजानन भुसेवार (वय 8 वर्षे) संचिता गजानन भुसेवार (वय 6 वर्षे) व मोना गजानन भुसेवार (वय 4 वर्षे) ह्या तीनही बहिणी घरात सकाळी जेवण करत बसल्या होत्या. एक बहीण कुलर सुरू करण्यासाठी गेली असता तिला शॉक लागला. आपल्या बहिणीला वाचवायला दुसरी बहिण धावली. मात्र तिलाही जोराचा शॉक बसला. नक्की काय घडलंय हे समजलं नसल्यानं लहानगी बहिण त्यांच्या जवळ गेली. या चिमुरडीलाही शॉकचा धक्का बसला. यामध्ये तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुलींचे आई-वडील शेतात गेल्यानं त्यांना या घटनेची माहिती लागली नाही. घरात कोणीही नसल्यामुळे तिन्ही बहिणींचे मृतदेह घरातच पडून होते.