आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येच्या घटना:मारेगाव तालुक्यात तीन दिवसांत तीन आत्महत्या

मारेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारेगाव तालुक्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवार अशा तीन दिवस आत्महत्येच्या घटना घडल्या. शुक्रवारी म्हैस दोडका येथे एका विवाहित तरुणाने कीटकनाशक प्राशन केले. शनिवार नरसाळा येथील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली तर रविवारी एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

सतीश बोथले रा. म्हैसदोडगा, गजानन नारायण मुसळे रा. नरसाळा आणि तोताराम अंगद चिंचोलकर रा. दांडगाव अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहे.दांडगाव येथील तोताराम चिंचोलकर यांच्या वडीलांच्या नावाने २३ एकर सामाईक शेती आहे. ते गावाचे माजी उपसरपंच देखील होते.

बातम्या आणखी आहेत...