आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीती:वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरात मध्यरात्री तीन वाहनांवर दगडफेक

वणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरासमोर उभ्या असलेल्या तीन घरगुती वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याची संतापजनक घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विठ्ठलवाडी परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात माथेफिरूने मध्यरात्री हा उपद्रव केला असून यात नागरिकांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्यात चांगलाच संताप दिसून येत आहे. अशा या उचापती करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कुरापतखोरांना हुडकून काढणे गरजेचे झाले आहे. ज्या तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, त्यात महेश सोमलकर, गजानन दोडके व आणखी एका व्यक्तीचे वाहन आहे.

मध्यरात्री विठ्ठलवाडी परिसरातील तीन घरगुती वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली. घरासमोर उभ्या असलेल्या एमएच-३१-एफए- ३७३३, एमएच-२९-बीव्ही- ३७६५ आणि एमएच-२२-एम- ४४८३ या तीन कारचे अज्ञात माथेफिरूने काच फोडले. कुरापतखोरांच्या या कुरापतीमुळे नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री घरासमोरील वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारचे कृत्य करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा या कुरापतखोरांना हुडकून काढणे गरजेचे आहे.

घरासमोरील वाहनांचे अशा प्रकारे नुकसान केले जात असल्याने नागरिकांमध्ये आपल्या वस्तूंविषयी असुरक्षितता निर्माण झाली आहे. शहरात अपप्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पोलिसांच्या पूर्वी प्रमाणे रात्रीच्या गस्त होत नसल्याने अपप्रवृत्तींच्या लोकांसाठी रान मोकळे झाले आहे. पूर्वी शहरातील प्रत्येक भागात पोलिस गस्त घालायचे. शहरातील प्रत्येक परिसरात मध्यरात्री पोलिस वाहनांचे सायरन ऐकू यायचे. पोलिस वाहनांचे ऐकू येणारे सायरन नागरिकांसाठी सुरक्षिततेची हमी असायचे . हल्ली मध्यरात्री पोलिस वाहनांचे सायरनच ऐकायला येत नाही. त्यामुळे सगळं काही बिनधास्त झालं आहे. रात्री बेरात्री कुणीही कुठेही फिरताना दिसतो. रात्री विनाकारण वस्त्यांमध्ये फिरणाऱ्यांवर वचकच राहिली नाही. पूर्वी रात्रीच्या वेळेला शहरात कुणी फिरताना दिसल्यास त्याला पोलिस जाब विचारायचे. त्यामुळे रात्रीला सहसा कुणी विनाकारण फिरत नव्हते. रात्रीला शहरात पोलिसांचा कडक पहारा असायचा. पण आता रात्रीला शहरात फिरण्यावर पाबंदी राहिलेली नाही. मध्यरात्री कुणीही कुठेही फिरताना दिसतो. त्यामुळेच अशा या कुरापती वाढल्या आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. तेंव्हा शहरातील प्रत्येक परिसरात पूर्वी प्रमाणे पोलिस वाहनांचे सायरन ऐकू यावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...