आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०१३ साली कृषी उत्पन्न बाजार समितीत हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार राजू तोडसाम यांना केळापूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश प्रदीप नाईकवाड यांनी तीन वर्षाचा सश्रम कारावास सुनावला.
पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २९ नोव्हेंबर २०१३ रोजी कापसाची खरेदी विक्री सुरू असताना कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप करीत राजू तोडसाम आपल्या १५ ते २० साथीदारांसह त्या ठिकाणी गेले होते. दरम्यान तेथील अधिकारी, कर्मचारी आणि व्यापारी यांच्या सोबत चर्चा करीत असताना या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले होते.
आंदोलकांनी बाजार समितीमधील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात करून साहित्य पेटवून दिले. यात समितीचे ३ लाख ६१ हजार रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. तर १ लाख १२ हजाराचे साहित्य चोरीस गेल्याने बाजार समितीच्या वतीने राजू तोडसाम आणि त्यांच्या १० ते १५ साथीदारांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार सुद्धा करण्यात आला होता.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राखी गेडाम यांनी सविस्तर चौकशी करून राजू तोडसाम यांच्यासह ९ जणांवर गुन्हे नोंदवून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. यात प्रत्यक्ष सुनावणी २०१८ ला सुरू झाली. यात राजू तोडसाम, नारायण भानारकर, किशोर घाटोळ, विकेश देशट्टीवार, सुधीर ठाकरे आणि नंदकिशोर पंडित या सहा आरोपी विरोधात शासकीय मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा ४ नुसार ३ वर्ष कारावास आणि दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.