आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वारे:दिग्रस तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान, 30 घरांना फटका; तुपटाकळी येथील अनेक घरांवरची टिनपत्रे उडाली

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार असून मान्सूनपूर्व पावसाने दिग्रस तालुक्यात मंगळवार, दि. ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान हजेरी लावली. यादरम्यान दिग्रससह तालुक्यातील अनेक भागात पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. ३ मिनिटे चाललेल्या या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील तुपटाकळी गावाला चांगलाच तडाखा बसला असून जवळपास ३० घरांवरील टिनपत्रे उडाली. आर्णी-दिग्रस मार्गावर असलेल्या तालुक्यातील तुपटाकळी या गावाला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ३ मिनिटांच्या वादळी वाऱ्याने गावातील ३० च्या वर घरांवरील टिनपत्रे उडाली.

यामधील पवन ठोंबरे यांच्या घराची पूर्ण टिनपत्रे उडून गेले व घरातील कांदे, गहू, ज्वारीची नासाडी झाली व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे नुकसान झाले. तसेच भीमराव साबळे यांच्या घरावरील सुद्धा पूर्ण टिनपत्रे उडून गेली तसेच शेषराव देशपांडे यांच्या घरावरील पूर्ण टीनपत्रे अंगल्स सोबत उडून गेले. यांच्यासोबत नरेंद्र वामनराव देशमुख, सुनील अजबराव ठाकरे, अण्णासाहेब गावंडे, सुरेश सोळंके व इतर २५ ते ३० घरांवरील टिनपत्रे उडून गावातील इतरत्र भागात उडाली. तो ३ मिनिटांचा वारा एवढा जोरदार होता की एक टिनपत्र गावातील एका खांबावरील ताराला गुंडाळल्या गेला. वादळी वाऱ्यामुळे अनेक तार तुटल्याने रात्री उशिरापर्यंत तुपटाकळी गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तुपटाकळीकरांनी टिनपत्रे उडून गेल्यानंतर रात्र कशीबशी घालवली. सकाळी आपल्या आपल्या टिनांचा गावकऱ्यांनी शोध घेलता. त्यातील काही गावकऱ्यांना आपली टिनपत्रे सापडली तर अनेकांचा संसार टिनपत्रे उडाल्याने उघड्यावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...