आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाव:निर्देशांची पायमल्ली करून रातोरात उभारले टीन शेड; भूखंड विक्रीचा गंभीर मुद्दा समोर

महागाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यायालयाच्या इमारती समोर उभारण्यात आलेले टिनशेडचे बांधकाम चांगलेच वादामध्ये सापडले आहे. न्यायालय इमारतीच्या अगदी समोरासमोरच बांधकाम उभारण्यात येत असल्यामुळे न्यायालयाने याची दखल घेत नगरपंचायतला सूचना करून वस्तुस्थिती बाबत विचारणा केली आहे. नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून बांधकाम त्वरित थांबवण्याची निर्देश दिले आहे. मात्र, या निर्देशाची पायमल्ली करून रातोरात टीन शेड उभे करण्यात आले आहे. कौशल्या विजय जाधव यांना न्यायालया समोरील अतिक्रमणाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ अन्वये कायद्यानुसार परवानगी आवश्यक होती. असे असतांना बांधकाम सुरु असल्याचे मुख्याधिकारी नगरपंचायतच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना त्वरित नोटीस बजावून अतिक्रमण थांबवण्यास सांगितले आहे.

नोटीस मिळताच सुरू असलेल्या अवैध बांधकाम जमिनीचा विकास ताबडतोब बंद करावा. या नोटीस मधील सूचनेचे पालन न केल्यास संबंधीत कायद्यातील तरतुदीनुसार आपण न्यायालयीन कारवाईस पात्र राहाल याची नोंद घ्यावी, अशा आशयाची नोटीस नुकतीच बजावली आहे. या अतिक्रमणाच्या अनुषंगाने सर्वे नंबर ५५ मधील भूखंड विक्रीचा गंभीर मुद्दा समोर आलेला आहे. या अतिक्रमण बांधकामावर नेमकी कोणती कार्यवाही केल्या जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...