आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास आ. ससाने यांची भेट

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निंगणुर येथील हिरामननगर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व सततच्या नापिकीला कंटाळून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या विवंचनेत आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दि. २९ ऑगस्ट रोजी आमदार नामदेव ससाने यांनी भेट दिली.

यावेळी शोक व्यक्त करीत सदर आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी. अशा सूचना उपस्थित नायब तहसीलदार पाईकराव व मंडळ अधिकारी फटाले यांना केल्या. तसेच कुटुंब अर्थ साहाय्य व विधवा निराधार योजने अंतर्गत पीडित कुटुंबियांना लाभ देण्याच्या संदर्भाने सूचना केल्या. याप्रसंगी विवेकानंद पाटील नलावडे, गोकुळ राठोड, मनोज जाधव मेट, मारोती गव्हाळे, गजानन नावडे, सचिन पंडागळे, अनुप शेखावत, राज शिरगिरे, नरेंद्र अवधूत, विश्वभर भोंगाळे, विजय भोरकडे व आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...