आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाला जप्त:सदोबा सावळीकडे जाणारा तंबाखू, पान मसाला जप्त

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ येथून सदोबा सावळीकडे चारचाकी वाहनातून जाणारा सुगंधित तंबाखू, पान मसाला जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी पथक आणि वडगाव जंगल पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडली. या कारवाईत चारचाकी वाहनासह सव्वासहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मो. दाऊद मो. युनूस डेलानी (४४) रा. कोहिनूर सोसायटी, यवतमाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोहिनूर सोसायटीतील मो. दाऊद मो. युनूस डेलानी हा यवतमाळ येथून सदोबा सावळीकडे चारचाकी वाहन क्रमांक एमएच-०४-बीवाय-५४४१ ने सुगंधित तंबाखू, पान मसाला घेवून जात होता. याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी आणि वडगाव जंगल पोलिसांना मिळाली. त्यावरून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अकोला बाजार मार्गावरील लोणी फाट्याजवळ ते चारचाकी वाहन अडवले. वाहनात इगल सुगंधित तंबाखूचे ४२० पाकीट, क्रेझ सुगंधित तंबाखूचे ६६ पाकीट, मजा १०८ सुगंधित तंबाखूचे ४० डब्बे, मजा १०८ सुगंधित तंबाखूचे छोटे १५० डब्बे, पान मसाल्याचे २५ पाकीट त्याचबरोबर इतर साहित्य आढळून आले.

पोलिस पथकाने मुद्देमाल आणि चारचाकी कार असा ६ लाख २० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी धनशाम दंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी मो. दाऊद मो. युनूस डेलानी याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल ठाणेदार पवन राठोड, पोलिस उपनिरीक्षक भास्कर दरणे, पथकातील गजानन कोरडे, निर्मल प्रधान, विकास कमनर, निलकमल भोसले यांनी पार पाडली. याबाबतचा पुढील तपास वडगाव जंगल पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...