आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला आत्ताच थांबवले पाहिजे. तरुण पिढी समाजाची आशा आहे. मात्र या तरुण पिढीवर संस्कार नसल्याने ती व्यसनाच्या आहारी जात आहे. भौतिक सुखाला आसुसलेल्या पालकांना ना संस्कार व परंपरा यांचा विसर पडलेला आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करावयास हवे असे प्रतिपादन मुख्याध्यापक सतीश उपरे यांनी केले. ते जाजू इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा या विषयावर व्याख्यानमालेत बोलत होते.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद (माध्यमिक) यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्यांच्या आदेशांचे पालन करत जाजू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवीन वर्षाचे आगमन होत असताना तरुण मंडळी पार्ट्या, दारु, गांजा, अमली पदार्थांचे सेवन करून नवीन वर्षाचे स्वागत करतात पण हे अत्यंत गैर आहे. हे युवा पिढीला कळावे यासाठी //"नशामुक्त भारत अभियान//"राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुद्धीत साजरे करा अश्या शब्दात विद्यार्थी व पालक मंडळीस नवीन वर्षाच्या शुभेच्छा संस्थाध्यक्ष प्रकाश जाजू, सचिव आशिष जाजू, संचालिका शिल्पा जाजू, मुख्याध्यापक सतीश उपरे, मुख्याध्यापिका रिता देशमुख, समन्वयिका सुचिता पारेख, तसनिम रतनामवाला, वंडरकिड्स माँटेसरीच्या पर्यवेक्षिका अवनी रायचुरा इत्यादींनी दिल्या. शिक्षक प्रमोद ढोले, अभिजित पोजगे, सारिका वेळूकर, गौरी दाणी, माहेवीश खान इत्यादींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.