आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसाची कोठडी:टमाटर; आद्या पाठोपाठ कवट्या अडकला एलसीबीच्या जाळ्यात

यवतमाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या बिलावरून झालेल्या वादात तरूणाला मारहाण करीत वाईन बार गोळीबार करण्यात आली होती. ही घटना शहरातील छोटी गुजरी परिसरात काही दिवसापूर्वी घडली असून या प्रकरणी पोलिसांनी नईम खान गुलाब नबी खान उर्फ नईम टमाटर, आद्या उर्फ आदेश खैरकार या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी यातील बारमध्ये गोळीबार करणाऱ्या कवट्या उर्फ अलीम शेख याला एलसीबीने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. रोहित जाधव, नयन सौदागर, रिज्जू सयानी आणि शेख इमरान शेख सलीम उर्फ कांगारू या तिघांचा शोध एलसीबीने सुरू केला आहे.

शहरातील छोटी गुजरी येथील एमपी जयस्वाल बारमध्ये सायंकाळपासून उशिरापर्यंत ६ ते ७ तरूण मद्यप्राशन करीत बसले होते. यावेळी प्रीतेश जयस्वाल यांना दारूचे ६ हजार रूपये बिलाची त्यांना मागणी केली. पैसे मागितल्याच्या कारणावरून त्या ठिकाणी वाद झाला. दरम्यान टोळक्यांनी बारमध्ये तोडफोड करीत मारहाण केली. तसेच हवेत गोळीबार करीत दर महिन्याला हप्ता देण्याची मागणी करीत जिवाने मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी जखमी प्रीतेश जयस्वाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ ते ७ जणांवर विविध गुन्हे नोंदवून नईम खान गुलाब नबी खान उर्फ नईम टमाटर आणि आद्या उर्फ आदेश खैरकार या दोघांना अटक केली होती.

त्यानंतर शुक्रवारी बारमध्ये गोळीबार करणाऱ्या कवट्या उर्फ अलीम शेख याला ताब्यात घेण्यात एलसीबीला यश आले. ही कारवाई एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पथकातील बंडु डांगे, नीलेश राठोड, सुधीर पिदुरकर, किशोर झेंडेकर, जितेंद्र सरनाईक यांनी पार पाडली. शनिवारी दुपारी कवट्या उर्फ अलीम शेख याला एलसीबी पथकाने न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.