आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक सहभागातून कृषी विकास:शेतीसाठी लागणारा खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांचा दौरा; दिलासा संस्थेमार्फत सेंद्रिय शेती पद्धती विषयी जागरूकता

राळेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक सहभागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत व दिलासा संस्था, घाटंजी मार्फत सेंद्रिय शेती पद्धती विषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्याविषयी शेतकर्‍यांचे ज्ञान वाढवणे, शेतीसाठी लागणारा खर्च कमी करून उत्पादन वाढविणे व पारंपारिक गावरान बियाणे बीज बँकेचे महत्व याविषयी माहिती देण्यासाठी तसेच प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या प्रमुख उद्देशाने राळेगाव क्लस्टर मधील लोहारा, एकलारा, शिवरा, श्रीरामपूर कू्ष्णापूर, पिंप्री दूरग, मांडवा, सोयटी, कोपरी, इंझापूर, वालधूर, चिकना व दापोरी या एकूण १३ प्रकल्प गावातील सेंद्रिय शेती गटातील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौरा भेटीचे आयोजन मार्च २०२२ या महिन्यामध्ये जहागीरपूर येथे करण्यात आले होते.

या अभ्यास दौरा भेटीमध्ये दिलासा टीम सदस्यांसह एकूण १७८ सदस्य सहभागी झाले होते. गाव भिली धामणगाव येथे रमेश साखरकर यांनी पारंपारिक गावरान बियाण्याची बीज बँक तयार करून त्यामध्ये जतन करून वेगवेगळ्या २७२ प्रकारच्या भाजीपाला व पिकांच्या गावरान बियाण्याचे महत्व, उत्पादन व त्याची गरज याबाबत माहिती दिली.

जहागीरपूर येथील माधव गिरी फार्म यांच्या शेतीला भेट दिली असता, त्यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती संकल्पना, सेंद्रिय शेतीची गरज, सेंद्रिय शेती कार्यपद्धती, खरीप नियोजन पूर्वतयारी व रासायनिक शेतीचे दुष्टपरिणाम, शेतीला हातभार लावण्यासाठी शेतीशी संबंधित व्यवसाय, तसेच सेंद्रिय शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती कशी करता येते याबाबत माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...