आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासी समाजात एकतेचे प्रतिक आहे. आदिवासी समाज एकतेच्या दिशेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन संभा मडावी यांनी केला. केळापूर तालुक्यातील सुन्ना येथे आदिवासी महिला संघटनेच्या वतीने बिरसा मुंडा यांना पुजन करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संभा मडावी, बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गजानन चांदेकर, हरिदास मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गजानन चांदेकर यांनी सुद्धा बिरसा मुंडावर आपले विचार मांडले. आदिवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा शुभांगी दडांजे, पुष्पा आत्राम, अलका मडावी, निशा मडावी, दिपमाला आत्राम, रेणूका गेडाम, कविता तोड साम हे सहभागी झाले. बिरसामुंडा तैलचित्राचे पुजन सरपंच्या ज्योती तोड साम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मोहनमाला मडावी, सारिका मडावी, गिता मडावी, नलु नैताम, मंजुळा कुळसंगे, उज्यवला मेश्राम, आरोही कुमरे, अर्जुन मडावी, वासुदेव तोडसाम, विनोद मेश्राम, जयराम कुमरे, पवन कुमरे, गजानन अग्गीलवार, किशोर येरमे, विजय कुमरे, अथर्व मडावी आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.