आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारव्हा येथून जवळच असलेल्या बोरी अरब येथे हनुमान जयंतीला गाडे ओढण्याची परंपरा आहे. पिढ्यान पिढ्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. कमरेला बैलगाड्या बांधून ओढण्याची ही परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसून आले आहे. बोरी अरब येथील मरी माय मंदिर हे फार पुरातन मंदिर आहे. येथील हनुमान जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठ्या श्रद्धेने गाड्या ओढण्याची परंपरा आजही कायम आहे. या परंपरेमध्ये एक भक्त आपल्या कमरेला सात ते नऊ बैलगाड्या बांधून ओढत असतो.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार, दि. ६ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता गावातील स्वामी चंद्रशेखर महाराज मंदिर ते मरिमाय मंदिर पर्यंत असा अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत कमरेला सात ते नऊ बैलगाड्या बांधून ओढल्या आहे. यंदा या गाड्या ओढण्याचा मान गावातील नागरिक प्रकाश भीमराव तायडे यांना मिळाला आहे. एका मागे एक बैलगाड्या लावून आणि त्यावर मोठ्या संख्येत नागरिकांना बसवून एका व्यक्तीने कमरेने गाडे बांधून ओढले आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.