आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे आतापर्यंत विविध प्रकारचे टप्पे पार पडले आहे. अशात बुधवार, दि. २१ डिसेंबर रोजी पासून संवर्ग एकच्या शिक्षकांसाठी बदलीचे पोर्टल सुरू झाले आहे. संवर्ग एक मधील एक हजार १९२ शिक्षकांना पोर्टलवर अर्ज भरता येणार आहे. ही मुदत शनिवार, दि. २४ डिसेंबर रोजी पर्यंत आहे. ह्या शिक्षकांना ३० गावांचे प्राधान्य नोंदवता येणार आहे.
शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाइन होणार आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे पाडून देण्यात आले आहे. अशात बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, जिल्ह्यात बदली पात्र एक हजार ५०१, तर बदली अधिकार पात्र २०९ शिक्षक आहेत. संवर्ग एक आणि दोनमध्ये अर्ज भरणाऱ्या काही शिक्षकांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यामुळे सध्या संवर्ग एकमध्ये एक हजार १९२ आणि संवर्ग दोनमध्ये १५० शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यात एक हजार ७९ जागा रिक्त आहेत.
अशात बुधवार, दि. २१ डिसेंबर रोजी संवर्ग एक मधील शिक्षकांसाठी बदलीचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या शिक्षकांना एकूण ३० गावांचे प्राधान्य निवडता येणार आहे. हे पोर्टल शनिवार, दि. २४ डिसेंबर रोजी पर्यंत सुरू राहणार आहे. तो पर्यंत शिक्षकांनी अर्ज भरावे, असे स्पष्ट आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे मुदत संपल्यानंतर पुन्हा रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तद्नंतर संवर्ग दोनच्या शिक्षकांसाठी पोर्टल सुरू होईल. एकंदरीत ग्रामविकास विभागाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यवाही केली आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार जिल्ह्यांतर्गत बदल्या आटोपणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
एक हजारांवर जागा रिक्त
जिल्ह्यात ८ हजार १७९ पदे मंजूर आहे. तर एक हजार ७९ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे बहुतांश शाळांमध्ये सध्या एक शिक्षक कार्यरत आहे. अशा शाळांची निवड बदली पात्र शिक्षक प्राधान्यक्रमाने करू शकतात, परंतू शिक्षकांना सोयीचे ठिकाणामध्येच सर्वाधिक इंटरेस्ट असल्याचे स्पष्ट दिसून येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.