आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांवरील शिक्षक ठरणार पात्र‎:बदली पोर्टल सुरू, अवघड क्षेत्रातील‎ रिक्त 95 जागा ऑनलाईन भरणार‎

यवतमाळ‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त‎ ९५ जागा ऑनलाईन बदल्यांतून‎ भरण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने‎ मंगळवार, दि. १४ मार्च रोजी शिक्षक‎ बदलीचे पोर्टल सुरू झाले असून,‎ १० वर्षांवरील शिक्षक ह्यासाठी पात्र‎ ठरणार आहे. विशेष म्हणजे संवर्ग‎ एक आणि ५३ वर्षांवरील ५२५‎ शिक्षकांनी नकार दर्शविला आहे.‎ त्यामुळे अशा शिक्षकांना सध्यातरी‎ बदल्यांमधून दिलासाच मिळाल्याचे‎ स्पष्ट दिसून येत आहे.‎ प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन‎ बदल्यांमध्ये शिक्षकांनी सोयीच्या‎ ठिकाणचे प्राधान्य नोंदवले होते.‎ त्यानुसार आतापर्यंतच्या पाच‎ टप्प्यात एकूण एक हजार ८५९‎ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या‎ झाल्या आहेत.‎

अवघड क्षेत्रातील रिक्त जागांकडे‎ शिक्षकांनी पूर्णत: दुर्लक्ष केले होते.‎ ह्या जागा भरण्याच्या दृष्टीने‎ बदल्यांच्या सहाव्या टप्प्याला‎ सुरूवात झाली होती. त्या अनुषंगाने‎ १० वर्षांवरील शिक्षकांच्या सेवा‎ ज्येष्ठ याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात‎ आल्या होत्या, परंतू ह्या याद्यात‎ संवर्ग एक, ५३ वर्षांवरील‎ शिक्षकांचा समावेश होता. त्यामुळे‎ शिक्षकांमध्ये बदल्यांविरोधात‎ कमालीची नाराजी उमटली होती.‎ राज्यभरातील शिक्षक संघटनांनी‎ शासनाला निवेदन दिले.‎ तद्नंतर होकार आणि नकार‎ दर्शविण्यासाठी शिक्षकांना मुदत‎ दिली होती.या बदली पोर्टलमध्ये‎ प्राधान्यक्रम नोंदवण्याकरिता चार‎ दिवसांचा अवधी देण्यात आला‎ असून, शुक्रवार, दि. १७ मार्च रोजी‎ मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शिक्षकांना‎ अर्ज करता येणार आहे. तद्नंतर‎ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून‎ बदल्यांची प्रक्रीया तीन चालविणार‎ आहे. आणि मंगळवार, दि. २१ मार्च‎ रोजी शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश‎ जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...