आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Yavatmal
  • Transformation After 40 Years In The Election Of Village Various Executive Co operative Societies, Shock To The Incumbents, Defeat Of The Panel Of Congress Taluka Presidents | Marathi News

निवडणुक:ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था निवडणुकीत 40 वर्षानंतर परिवर्तन, प्रस्थापितांना हादरा,काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या पॅनलचा पराभव

उमरखेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची बनलेल्या लोहरा (खु.) ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या नवयुवकांनी ४० वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे यांच्या शेतकरी सहकारी विकास पॅनलचा पराभव केला. यात ११ पैकी १० संचालक निवडून आणले. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडणुकीनंतर परिवर्तन पॅनलच्या प्रमुखांसह मतदारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

सहकारी संस्थेवर मागील ४० वर्षापासून एकछत्री राज परिवर्तन पॅनलने संपुष्टात आणले. प्रस्थापितांना मतदारांनी नाकारल्याने त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. लोहरा ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे महिला मतदार संघातून सुमित्राबाई शिंदे, सुवर्णा शिंदे निवडूण आल्या, तर अनुसूचित जाती मतदार संघातून ग्यानबा विनायते हे निवडूण आले. सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून आत्माराम शिंदे, आनंदाबाई शिंदे, उमेश शिंदे, चंद्रकला शिंदे, प्रकाश शिंदे, शिवाजी शिंदे, हनुमान शिंदे हे १० संचालक निवडूण आले. तर प्रस्थापितांच्या पॅनलचे प्रभाकर शिंदे यांचा एका मताने विजय झाला. या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचा चंग बांधत मतदारांनी परिवर्तन पॅनलला घवघवीत यश पदरात पाडले. या निवडणुकीत लोहरा गावातील युवकांना साथ देत समस्त ग्रामवासीयांनी परिश्रम घेत प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळविले. परिवर्तन पॅनलच्या हातात सहकारी संस्थेची सत्ता प्रदान केली.