आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक,वाहन पकडले

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वसंत नगर परिसरातील एका महाविद्यालयासमोरून चारचाकी वाहनातुन प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाचा घेवून जाणारे वाहन अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी पकडले. ही कारवाई दि. १४ ऑगस्टला दुपारच्या सुमारास करण्यात आली.

यवतमाळच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांनी वसंत नगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली असून ७ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फहीमोद्दीन करिमोद्दीन वय ३९ वर्ष रा. रहेमत नगर, न.प.उर्दु शाळेजवळ असे गुन्हे दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंत नगर परिसरातून एका चारचाकी वाहनाने प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून दि. १४ ऑगस्टला दुपारी सापळा रचून एका महाविद्यालया परिसरात चारचाकी वाहन क्रमांक एमएच-३७- ७७७७ अडवून तपासणी करण्यात आली.

यावेळी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पान मसाला व तंबाखू जन्य पदार्थांचा माल असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी संपूर्ण माल आणि वाहन असा एकूण ७ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त गोपाल माहोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिसांनी फहीमोद्दीन करिमोद्दीन वय ३९ वर्ष रा. रहेमत नगर, विविध गुन्हे नोंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...