आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:खंडाळा घाटात पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दुर्घटनेत जवळपास 25 प्रवासी जखमी, 1 ठार झाल्याची माहिती

यवतमाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे ते यवतमाळ लिबर्टी ट्रॅव्हल्स वाशिमकडून पुसदकडे येणारी ट्रॅव्हल यवतमाळ मार्गे जाणार होती.

जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खंडाळा घाटात बुधवार, दि. 21 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ड्रायव्हरचे रस्त्याच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुणे ते यवतमाळ लिबर्टी ट्रॅव्हल्स वाशिमकडून पुसदकडे येणारी ट्रॅव्हल यवतमाळ मार्गे जाणार होती. पण हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वीस ते पंचवीस प्रवासी जखमी असून 17 प्रवाशावर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...