आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉयन्स क्लबतर्फे रविवार, दि. ३१ जुलै रोजी प्रयास वन येथे ५० झाडांचे संवर्धन व विकास करण्याकरिता ५० हजार रुपयांची मदत एमजीएफ लॉयन्स पुष्पा पालडीवाल यांच्या फॅमिली ट्रस्ट द्वारा प्रयास वन मंडळाला देण्यात आली.
पुष्पा पालडीवाल यांनी आता पर्यंत लॉयन्स क्लबच्या मदतीने प्रयास वन या संस्थेला सात लाखांची एकुण मदत देण्यात आली आहे. फुलपाखरू उद्यान या संकल्पनेचे उद्यान प्रयास वन येथे साकार होत आहे. लावलेल्या ५० रोपांना लॉयन्स क्लब वन क्षेत्र असे नाव देण्यात येईल. लॉयन्स क्लबच्या अनेक सदस्यांनी अनेक झाडांचे पालकत्व स्वीकारले आहे. या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांनी उपस्थिती व अध्यक्ष पद स्वीकारले हे विशेष. त्यांच्या हस्ते २ झाडांचे रोपण करण्यात आले.
प्रयास वन संस्थेतर्फे एमजीएफ लॉयन्स पुष्पा पालडीवाल यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रयास वनचे डॉ. विजय कावलकर, लॉयन्स डिस्ट्रिक्ट जीएसटी को. ऑरडिनेटर मनिषा ठक्कर यांनी नागपूर वरून येऊन प्रतिसाद दिला. त्यांच्या हस्ते झाडांचे रोपण करण्यात आले. लॉयन्स क्लबचे झोन चेअरमन छोटू भाई खेतानी तसेच कॅबिनेट ऑफिसर सुनिल जोशी, प्रेसिडेंट मनोज अग्रवाल तसेच सचिव शरद निमोदिया, कोषाध्यक्ष अशोक पटेल तसेच लॉयन्स हुकुमचंद पालडीवाल, अभय गांधी, विजय खोरिया समस्त व त्यांची संपूर्ण टीम यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. विशेष नमूद करायचे म्हणजे लॉयन्स क्लब याचे ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्याने ५० झाडे लावून लॉयन्स क्लबने वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचे कार्य केले आहे. .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.