आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावन विभागातील माहूर रोडलगत कासोळा गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या क्र. ८१० मध्ये जागतिक पर्यावरण दिनानमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सं.व.व्य. समीती, कासोळा ग्रीन मिशन, रोटरी क्लब, वसुंधरा बहुद्देशीय संस्था, ग्रामपंचायत कासोळा यांच्या संयुक्त सहकाऱ्याने यशस्वी पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक सोनकुसरे, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्षा डॉ. माधवी गुल्हाणे, प्रा. दिनकर गुल्हाणे, रोटरी क्लबचे डॉ. खेडकर, अमोल गंगात्रे, सरपंच बाबाराव राठोड, पोलीस पाटील अरविंद जाधव, रेश्मा लोखंडे, डॉ. डांगे, डॉ. गुजर, एसीए. नरोडे, विश्वास करे, आरएफओ प्रवीण राऊत, कुणाल लिमकर, सचिन सावंत, विशाल झांबरे, अजय राऊत, कुरोडे, मुनेश्वर तसेच वन विभागातील सर्व वनपाल, वनसंरक्षक वन मजूर तथा कासोळा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरएफओ प्रवीण राऊत यांनी केले. त्यांनी प्रस्तावनेमध्ये पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची पार्श्वभूमी व उद्देश नमूद केले. आयोजित कार्यक्रमाचे व्यवस्थापन तसेच वृक्षारोपण पुढे चालून एक चांगली परिसंस्था तयार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. त्यानंतर रेश्मा लोखंडे यांनी पर्यावरण व ऑक्सिजन यांचा संबंध समजावून सांगितला. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेल्या डॉ. माधव गुल्हाणे यांनी आपल्या भाषणातून पर्यावरणाचे महत्त्व व त्यापासून होणारे दुष्परिणाम व त्याप्रती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी विशद केली. तसेच अध्यक्षीय भाषणात उपवन संरक्षक अशोक सोनकुसरे यांनी हा कार्यक्रम फक्त वन विभागाचा नसून आपण सर्वांचा आहे असे सांगितले. यापुढे वृक्षारोपणाची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून स्थानिक ग्रामस्थांना या वृक्षारोपणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन माधुरी गुल्हाणे यांनी केले. कासोळा वनपरिक्षेत्र एकूण एक हेक्टरमध्ये ५०० विविध स्थानिक प्रजातीची चार-चार मीटर अंतरावर लागवड केली. आरएओ गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण राऊत, वनक्षेत्रपाल गंगाखेडे, अतिरिक्त कार्यभार वनक्षेत्रपाल काळी व गुंजचे सहाय्यक रवि राठोड यांनी नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.