आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटू आठवणी लक्षात घेता वृक्षारोपण:वृक्ष लागवड ही एक लोकचळवळ व्हावी

दिग्रस6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूच्या बिकट काळात अनेक कोरोनाबाधित रुग्ण केवळ वेळेवर प्राणवायू मिळाला नाही म्हणून दगावलेत त्या कटू आठवणी लक्षात घेता वृक्षारोपण करणे व त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड हा केवळ एक उपक्रम न राहता ती एक लोक चळवळ व्हावी जेणेकरून येणारा काळ हा पुढील पिढीसाठी सुखकर होईल असे आवाहन आर. व्ही. हेरिटेज या पूर्व प्राथमिक इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी केले.

आर. व्ही. हेरिटेज या पूर्वप्राथमिक इंग्लिश स्कूलच्या नर्सरी ते के. जी. २ च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या दिवशी विविध वृक्षांची वेशभूषा केली व वृक्षसंवर्धनाचे हस्तलिखित पोस्टर तयार केलीत. उपक्रामाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शितल कन्नावार, प्राप्ती गोविंदवार, रुपाली ताकपीरे, अर्चना बरडे, नीता भगत, शीबा शेख, प्राजक्ता दुधे, शितल दीक्षित, मीनल सांखला, गौरी तळोकर, मनीषा उमरे, आशा बावणे व हर्षा हेडाऊ यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...