आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत निंगनुर येथील अरबाज अली नवाब या विद्यार्थ्याने कर्नाटकातील बंगलोर येथील यादगीर शारदा मेडीकल कॉलेजमधून बीएएमएसच्या वैद्यकिय पदवी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केल्याने त्याने मिळविलेल्या यशाबद्दल निंगनुर येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. सुनील बरडे, नईम अली नवाब, इमरान खान. पी. सी. भोळे, बबलू नवाब, बाबर खान, हेमंत सकर्ग, मैनुद्दिन सौदागर, गजानन नावडे, मारोती गव्हाळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक व विद्यार्थी हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. कवाने, यांच्यासह शिक्षक एस. टी. कहुळकर, पी. झेड. जाधव, व्ही. जी. ठाकरे, एस. आर दुधेवार, यु. के. तास्के, आर. एम. मिराशे, तास्के, बेदे, पी. बी. देशमुख, लिपीक संजय पेंधे, शिपाई प्रेम खुपसे, आदिंनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.