आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिमा कोरेगाव शौर्य दिनी शुर वीरांना बुद्ध भीम गीताने कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेना शाखा पुसदच्या व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. दि. १ जानेवारी नववर्षाची सुरुवात असते. परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. दि. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८ हजार सैन्यांचा पराभव केला होता. त्यानंतर विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भीम टायगर सेना शाखा पुसदच्यावतीने शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या शूर विराना बुद्ध, भीम गीतातून मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले.
दि. १जानेवारी २०२३ रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सुजाता महिला मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण घेण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम सुषमा देवी धम्मदीक्षा वाहुळे लातुरकर, नांदेड येथील विकासराजा गायकवाड यांचा शांती आणि क्रांतीवर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे उद््घाटक डॉ.प्रशांत वासनिक यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक,सुधीर देशमुख, विनोद फुलमाळी,पंजाब कांबळे, भोलेनाथ कांबळे, देवेंद्र खडसे, लक्ष्मण कांबळे, दिनेश खांडेकर, समाधान केवटे, नारायण ठोके, स्वागत अध्यक्ष प्रा. महेश हंबर्डे प्रा.डॉ सुनील खाडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू सरकटे, प्रभाकर खंदारे, राजकुमार पठाडे,गीता कांबळे, राजू पठाडे, अण्णा दोडके, गौतम खडसे, दीपक गायकवाड, राहुल धुळधुळे व भीम टायगर सेना भीम टायगर सेना महिला आघाडी, भीम टायगर सेना ऑटो अंबुलन्स,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन गजभिये व अंबादास वानखेडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन किशोर कांबळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.