आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:दिग्रसमध्ये तिरंगा सन्मान अभियान; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव

दिग्रस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सेलिब्रेशन करून झालय. आता वेळ आहे त्याचा योग्य सन्मान राखण्याची! तिरंग्याचा अवमान होणार नाही, त्याचा अपमान होणार याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी दिग्रसच्या डॉ एपीजे अब्दुल कलाम फोरमने पुढाकार घेतला असून उपयोगात आलेले तिरंगे सन्मान पूर्वक परत करण्याचे आवाहन केले आहे.

त्यासाठी त्यांनी काही मोबाईल नंबर व्हायरल केले असून त्यावर मिस कॉल दिल्यास फोरमची चमू तुमच्या घरी येऊन सन्मान पूर्वक ध्वज स्वीकारतील. आपल्याकडे मळलेला, चुरगळलेला, फाटलेला तिरंगा असेल तोही फोरमचे सुपूर्द करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तहसीलदार प्रवीण धानोरकर व मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...