आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस दारव्हा रस्त्याचे काम सुरू असून सद्या दिग्रस चिंचोली उतारातील रस्त्याच्या कामावरील विना चालक ट्रक अचानक सुरू झाल्याने एकच धांदल उडाली. विना चालक ट्रक सरळ उताराच्या दिशेने चालत येऊन विद्युत खांबाला धडकल्याची घटना सोमवार, दि. २ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली असून यावेळेस दिग्रस दारव्हा रस्त्यावर सुदैवाने कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. विद्युत खांबाला धडकल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या व परिसारातील दुकानातील फ्रीज व अन्य साहित्य निकामी झाल्याची माहिती आहे.
ट्रक क्रमांक एमएच-१२-एसएफ-४३६९ हा न्यूटलमध्ये चिंचोली उतारात सुरू होता. अचानक ट्रक उताराचा विना चालकाचा पळत सुटला. त्यामूळे अनेकांची भंबेरी उडाली. ट्रक सरळ चालत विद्युत खांबावर धडकल्याने विजेच्या तारा तुटल्या त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ट्रकला विद्युत शॉक असल्याची शंका आल्याने न्यूट्रल अवस्थेत असलेला ट्रक काही काळ घटनास्थळी सुरूच होता.
त्यामधील डिझेल संपताच ट्रक बंद पडला. दिग्रस दारव्हा रस्त्यावर नेहमी वाहनांची रेलचेल असते परंतु घटनेच्या वेळी रस्त्यावर कोणतेही वाहने नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीला दिली असता विद्युत पुरवठा बंद करून ट्रकला बाजूला घेण्यात आले. या धडकेने विद्युत खांब वाकले असून विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीने खंडित झालेला वीज पुरवठा एका तासात सुरू केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.