आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामराम:आर्णी तालुक्यातील वीस युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम

आर्णी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला वारंवार एकामागे एक झटके लागत आहेत. आमदार संजय राठोड व खासदार भावना गवळी यांच्या बंडखोरीनंतर आता आर्णी तालुक्यातील वीस युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात सामिल होऊन शिवसेनेला राम-राम केला आहे.

आर्णी तालुक्यातील खेड बीड येथील विस युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांना पाठवलेल्या पत्रात आम्ही युवासेनेचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये युवासेना विभागप्रमुख राजेश राठोड, युवराज देवकर, राजेश आडे, अनिल पवार, दिनकर राठोड, गोविंद राठोड, प्रभु पवार, संजय देवकर, सुभाष जिरे, संतोष माने, सूरज गाडे, बंडू मिरासे, विनोद भरकडे,गजानन जाधव, मनोज पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन राठोड, विनोद जाधव आदीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...