आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायर करणे अंगलट:दोन आरोपींना अटक करुन देशी कट्टा, दोन जिवंत काडतूस केले जप्त

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगरगाव येथे एका कार्यक्रमात देशी कट्ट्यातून हवेत फायर करणाऱ्यासह त्याच्या साथीदारास अटक करुन त्यांच्या जवळुन एक देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली.

डोंगरगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान पुसद येथील एका आरोपीने देशी कट्ट्यातून हवेत फायर केला. या घटनेची चर्चा सुरू होवुन एक व्हीडीओ देखील व्हायरल झाला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पुसद परिसरात गस्तीवर होते. या पथकाला डोंगरगाव येथे घडलेल्या घटनेतील आरोपीची माहिती मिळाली. पथकाने पुसद शहरातील मजहर खान जफरउल्ला खान यास ताब्यात घेतले. त्याने डोंगरगाव येथे राहणाऱ्या मित्राच्या देशी कट्ट्यातून हवेत फायर केल्याची कबुली दिली. त्यावरुन या पथकाने डोंगरगाव गाठून सय्यद मुसवीर सय्यद जमील वय २९ वर्षे यास ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...