आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर जप्त‎:सावंगा गुरव येथे वाळूची तस्करी‎ करणाऱ्या दोघांना अटक; तीन ट्रॅक्टर जप्त‎

नांदगाव खंडेश्वर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावंगा गुरव‎ येथील बेंबळा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी‎ करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.‎ कारवाईदरम्यान ट्रॅक्टर (एमएच ३७/ एल ६७४६)‎ व त्याचा चालक शेख शब्बीर शेख गफूर तसेच‎ एमएच २९/ व्ही ४१३१ चा चालक शुभम राजू लोमटे‎ यांना ताब्यात घेण्यात आले, तसेच एमएच ३७/ एल‎ ५३२१ हा तिसरा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.‎

कारवाईदरम्यान एकूण ६० हजार रुपये किंमतीची‎ वाळू जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी‎ (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. ही‎ कारवाई एपीआय प्रदीप कांबळे यांनी ठाणेदार‎ विशाल पौळकर यांच्या मार्गदर्शनात केली.‎ जप्त करून पोलिस ठाण्यात लावलेले वाळूचे ट्रॅक्टर.‎

बातम्या आणखी आहेत...