आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणूक काळात देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, २० डिसेंबरला वणी शहरात केली. सौरभ नगराळे वय २२ रा. राजुर कॉलरी, वणी आणि सचिन शेनाडे वय ५५ रा. डोल मच्द्री ता. मारेगाव अशी ताब्यात घेण्यात आलेले दोघांची नावे असून, त्या दोघांकडून सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, वणी शहरातील गोकुलनगर येथील अशोक दुर्गमवार चालवत असलेल्या देशी दारू दुकान शासकीय नियमाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू होते. त्या ठिकाणाहून काही व्यक्ती वाहनाने रासाकडे देशी दारू अवैधरीत्या घेऊन जाणार असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यावरून मंगळवारी वणी येथील ड्रीमलँड सिटी परिसरात एलसीबीने ते वाहन थांबवले.

या वेळी चारचाकी वाहनात देशी दारू आणि वाहन असा एकूण ३ लाख २७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पथकातील उल्हास कुरकुटे, महेश नाईक, सुधीर पिदुरकर, राम पोपळघाट, नरेश राऊत यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...