आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात‎:दोन दुचाकींची धडक;‎ 3 जखमी, दोन गंभीर‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस दारव्हा रस्त्यावरील‎ रोहनादेवी गावाजवळ दोन‎ दुचाकींची समोरासमोर झालेल्या‎ अपघातात २ जण गंभीर जखमी‎ तर १ किरकोळ जखमी झाल्याची‎ घटना दि. ३ जानेवारीला दुपारी १‎ वाजताच्या सुमारास घडली.‎ वनील दत्ता राठोड वय ३५ वर्ष‎ रा. मोख हा दिग्रस वरून‎ डिस्कव्हर दुचाकी क्रमांक‎ एमएच-२९-बीएच-६१२२ ने‎ आपल्या गावी जात होता.‎

अशातच दिग्रस दारव्हा‎ रस्त्यावरील रोहनादेवी जवळ‎ दारव्हा कडून येणाऱ्या बुलेट‎ क्रमांक एमएच-३०-जे १००‎ यांच्यात समोरासमोर जबर धडक‎ झाली. या अपघातात डिस्कव्हर‎ वरील एक जण व बुलेट वरील‎ एक जण गंभीर जखमी तर एक‎ किरकोळ जखमी झाला असून‎ त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात‎ उपचार सुरू आहे. वृत्त लिहिस्तोर‎ पोलिसांत तक्रार दाखल नव्हती.‎

बातम्या आणखी आहेत...