आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पांढरकवड्यातील दुचाकी चोरटा अखेर गजाआड, 23 दुचाकी जप्त

पांढरकवडा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगाणा राज्यातील अदिलाबाद येथून दुचाकी चोरुन आणुन त्या पांढरकवडा शहरात विक्री करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास पांढरकवडा पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी अटक केली. इतकेच नव्हे तर त्याने शहरात विक्री केलेल्या तब्बल २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई बुधवार दि. १५ जुन रोजी दिवसभरात करण्यात आली.

शफिक बाबु खान वय ३२ वर्षे रा. खुर्शिद नगर अदिलाबाद असे दुचाकी चोरट्या आरोपीचे नाव आहे. शफिक हा गेल्या काही महिण्यापुर्वी पांढरकवडा येथील इंदिरा नगर येथे आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास आला होता. त्या दरम्यान त्याने शहरात अनेकांशी ओळखी केली होती. याच ओळखीतुन तो अदिलाबाद येथून चोरुन आणलेल्या दुचाक्या शहरातील नागरिकांना १० ते १५ हजारात विकत होता. दरम्यान पांढरकवडा पोलिसांना या दुचाकी बाबत संशय आल्याने त्यांनी त्या दुचाकीचे नंबर व चेचेस नंबर अदिलाबाद पोलिसांना पाठविले होते.

बातम्या आणखी आहेत...