आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालक गंभीर अवस्थेत:सदावर्तेंच्या वाहनाच्या धडकेत दोन मुले जखमी

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद बसस्थानक समोरील कारला रोडवर जिनिंग प्रेसिंगसमोर १८ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता पायी जाणाऱ्या दोन मुलांना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहन क्रमांक एमएच ०१ इडी १०० या वाहनाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून धडक दिली. या धडकेत दोन्ही बालक गंभीर अवस्थेत जखमी झाले. त्यात एकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची गंभीर घटना घडली. या वेळी सदावर्ते यांनी जखमींना पाहून थांबले परंतु कुठल्याही प्रकारची दखल व माणुसकी न दाखवता पुढील प्रवासाला निघून गेले. विशेष बाब म्हणजे त्यांच्यासोबत सुरक्षा पोलिसही होते.

या घटनेमुळे सदावर्तेंबद्दल संताप व्यक्त केला. सदावर्ते यांनी एसटी कामगारांना न्याय मिळवून दिल्याने देशभर प्रसिद्ध झाले व कामगारांची संघटना बांधणीसाठी ते पुसदला आले होते. त्यांनी जखमी मुलांची विचारपूस करायला पाहिजे होती. सदावर्ते यांच्यासह त्यांच्या सहा ते सात गाड्यांच्या ताफ्यातील इतरांनी सुद्धा गंभीर मुलांना उपचारार्थ नेण्यासाठी साधी माणुसकीही दाखवली नाही. या गंभीर जखमींना जमलेल्यांनी येथील डॉ. पंकज बासटवार यांच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अथर्व लक्ष्मण खैरे वय १४ व शिवा हनुमान सोळंके वय १८ हे दोघे जखमी झाल्याची तक्रार लक्ष्मण विद्याधर खैरे यांनी दिली. यावरून वाहन चालकाविरुद्ध वसंत नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...