आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांची निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत.सध्या एक वर्षांची दिलेली मुदतवाढ सुद्धा संपुष्टात आली आहे. अशा एकूण चार बाजार समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. तर येत्या काळात उमरखेड आणि पांढरकवडा ह्या दोन वगळता उर्वरीत बाजार समित्यासुद्धा प्रशासका राज येणार आहे. विशेष म्हणजे मुदत संपलेल्या राळेगाव आणि कळंब बाजार समितीने स्टे आणलेला आहे. जिल्ह्यात एकूण १७ कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत.
यातील १५ बाजार समितीचा कार्यकाळ मागिल वर्षीच संपुष्टात आला होता. मात्र, कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे विहित मुदतीत निवडणुका होवू शकल्या नाही. अशा परिस्थितीत बाजार समितीच्या संचालक मंडळाला वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील पुसद, दारव्हा, बोरीअरब, वणी, राळेगाव, कळंब बाजार समितीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुसद, दारव्हा, बोरीअरब, वणी बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला असून, कळंब, राळेगाव बाजार समितीने न्यायालयातून स्टे आणलेला आहे. परिणामी, संचालक मंडळच बाजार समितीचा कारभार सांभाळत आहे. येत्या काळात आर्णी, यवतमाळ, बाभूळगाव, नेर, दिग्रस, महागाव, घाटंजी, झरीजामणी, मारेगाव बाजार समितीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र, राज्य शासनाने सहकारच्या निवडणुकांना ३० सप्टेंबर पर्यंत स्थगिती दिली आहे. तत्पूर्वी मुदत संपणाऱ्या बाजार समितीवर प्रशासक नेमल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर जिल्ह्यातील उमरखेड आणि पांढरकवडा बाजार समितीची मुदत फेब्रुवारी २०२४ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना मिळणार मतदानाचा अधिकार
तत्कालीन भाजप-सेना सरकारने बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. मात्र, महा विकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलवला होता. पुन्हा शभाजप सत्तेत आला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा आहे, अशा शेतकऱ्यांची यादी पाठवल्याची माहिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.