आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाजगी रुग्णालयात‎ उपचार:दिग्रस शहरात दिवसभरात आढळले‎ दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण‎

दिग्रस‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर‎ काढल्याने कोरोना चाचण्या सुरू‎ झाल्या आहे. त्यातच मंगळवार, ४‎ एप्रिलला दिग्रस शहरात दोन कोरोना‎ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये‎ स्थानिक संभाजी नगरातील एक २८‎ वर्षीय युवक व गांधी नगरातील एक‎ ६८ वर्षीय महिला हे दोन्ही रुग्ण दिग्रस‎ बाहेर असून, खाजगी रुग्णालयात‎ उपचार घेत असल्याची माहिती‎ ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.‎ घाबरू नका काळजी घ्या,‎ कोरोना नियमांचे पालन करा.‎ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे दिग्रस‎ शहरातील असून, ते बाहेरगावी‎ कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह‎ आढळले असून ते बाहेर गावीच‎ असून तेथील खाजगी रुग्णालयात‎ उपचार घेत आहेत.

नागरिकांनी‎ घाबरून न जाता काळजी घेण्या‎ सोबतच सार्वजनिक व गर्दीच्या‎ ठिकाणी मास्क लावणे, नियोजित‎ अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुण्यासह‎ स्वच्छता पाळणे कोरोनाच्या या‎ त्रिसूत्री नियमांचे काटेकोर पालन‎ करणे गरजेचे आहे त्याच बरोबर‎ ज्यांना ताप, सर्दी, खोकला व‎ अंगदुखी आहे अशा रुग्णांनी‎ आपली आरोग्य तपासणी करून‎ डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधी‎ घ्यावी औषधी घेऊनही प्रकृतीत‎ सुधारणा होत नसेल तर अशा‎ रुग्णांनी ग्रामीण रुग्णालय येथे‎ कोरोना चाचणी करून घ्यावी त्याच‎ प्रमाणे ज्यांचे अजूनही लसीकरण‎ झाले नाही त्यांनी त्वरित लसीकरण‎ करून घ्यावे व ज्यांचे लसीचे दोन्ही‎ डोस झाले पण बूस्टर डोस घेतला‎ नाही त्यांनी त्वरित बूस्टर डोस‎ घेण्याचे आवाहन कोविड केअर‎ सेंटर प्रमुख डॉ. अभय गोविंदवार‎ यांनी नागरिकांना केले आहे.‎

यवतमाळात आढळला‎ एक कोरोना बाधित‎ यवतमाळ | जिल्ह्यात कोरानाने‎ पुन्हा डोकेवर काढले आहे. जुने‎ दोन आणि मंगळवारी एकाच‎ दिवशी तब्बल १० पॉझिटिव्ह रुग्ण‎ आढळून आल्याने प्रशासन‎ खडबडून जागे झाले. तर‎ बुधवार, ५ एप्रिल रोजी पुन्हा एक‎ जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून‎ आला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ही‎ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ वर‎ पोहोचली आहे. जिल्ह्याभरात‎ एकूण ४१२ जणांची‎ ‘कोविड-१९’ ची चाचणी‎ करण्यात आली होती. यात‎ यवतमाळ येथील एक पॉझिटिव्ह‎ आढळून आला असून, उर्वरीत‎ ४११ चाचण्या निगेटिव्ह आहेत.‎ आरोग्य विभागाने दक्षता घेम्याचे‎ आवाहन केले आहे.‎