आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून दोघांचा मृत्यू

मारेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकून दोघांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरूवार, दि. १५ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजता सुमारास मारेगाव ते करंजी मार्गावरील खडकी वळणावर घडली. हरिदास लक्ष्मण टेकाम आणि किसन लखमा टेकाम दोघेही रा. सालाईपोड.(खंडणी) असे मृत चुलत भावांची नावे आहे.

सालाईपोड.(खंडणी) येथील हरिदास आणि किसन दोघेही भाऊ आपल्या दुचाकीने मारेगावकडे येत होते. यावेळी मारेगाव ते करंजी मार्गावरील खडकी वळणावर बंद ट्रक रात्री उभा होता. पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रकवर धडकली. यात हरिदास याच्या डोक्यास जबर मार लागून जागीच ठार झाला तर किसन गंभीर जखमी झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेवून त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...