आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह आढळून खळबळ:मारेगावात दोन घटनेत दोघांचा मृत्यू

मारेगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पहिल्या घटनेत कान्हळगाव रस्त्यालगत राहणाऱ्या अनिल आत्राम वय २८ वर्ष, याला कुलरचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या इसमाचा महामार्गानजीकच्या एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार अनिल आत्राम हा आपल्या घराच्या मागील बाजूला कुलर जवळ उभा होता. अशात त्याला कुलरचा शॉक लागला. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या घटनेत महामार्गाजवळ सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मधू झिंगर सहारे वय ३७ वर्ष, रा. देवरी, ता. साकोली, जी. भंडारा हा कुटुंबासोबत एक महिन्यापूर्वी आला होता. अशात शुक्रवार, दि. २९ जुलै रोजी कुणाला न सांगता अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबातील सदस्यांनी शहरासह देवरी येथे शोध घेतला होता. मात्र, त्याचा शोध लागला नसल्याने शुक्रवारी मारेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.

असे असताना सोमवार, दि. एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जुने न्यायालय परिसरात मधू याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...