आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात आरोपीवर गुन्हे‎:शहरात दोन घरफोड्या, सोन्याच्या‎ दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लंपास‎

यवतमाळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंद घराचे कुलूप उघडून‎ सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा‎ मुद्देमाल लंपास करणाऱ्या‎ आरोपींविरुद्ध बुधवारी‎ अवधुतवाडी ठाण्यात गुन्हे नोंद‎ करण्यात आले. यातील एक‎ घटना शहरातील चापनवाडी, तर‎ दुसरी घटना आर्णी मार्गावरील‎ सह्याद्री सोसायटीत घडली.‎ या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून‎ मिळालेल्या माहितीनूसार,‎ शहरातील चापनवाडी येथील‎ रोशनी गणवीर या तरुणीने‎ अवधुतवाडी पोलिस ठाण्यात‎ दिलेल्या तक्रारीनुसार दि. ९‎ फेब्रुवारीला तिची आई रुग्णालयात‎ कामासाठी गेली होती. तर रोशनी‎ देखील अभ्यासिकेत गेली होती.‎ दुपारी बाराच्या सुमारास संशयित‎ ममता बोरकर ही महिला त्यांच्या‎ घरी आली होती.

ही बाब‎ सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून‎ आली. सदर महिलेने घराचा कुलूप‎ कोयंडा काढून आत प्रवेश केला.‎ त्यानंतर घरातील बॅगचे कुलूप‎ उघडून अंगठी, सोन्याचे मनी,‎ चांदीच्या पाटल्या असा जवळपास‎ १८ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल व १०‎ तोळे चांदीचे दागिने लंपास केले.‎ या प्रकरणी अवधुतवाडी‎ पोलिसांनी संशयित ममता बोरकर‎ रा. आठवडी बाजार हिच्याविरुद्ध‎ गुन्हा नोंद झाला आहे.‎ दुसऱ्या प्रकरणात सह्याद्री‎ सोसायटीतील आदित्य कांडेलकर‎ याने अवधुतवाडी ठाण्यात तक्रार‎ दिली. त्यानुसार आदित्यचे कुटुंबीय‎ दि. २७ फेब्रुवारीला घराला कुलूप‎ लावून नातेवाईकांकडे गेले होते.‎ दरम्यान दुसऱ्या दिवशी दि. २८‎ फेब्रुवारीला घरी परतले असता‎ घराचे कुलूप तुटलेले दिसले.‎ कुटुंबीयांनी घरात जावून पाहणी‎ केली असता कपाटाचे दार तोडून‎ चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम‎ असा एकूण ७० हजार रूपयांचा‎ मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी‎ अवधुतवाडी पोलिसांनी सुरू‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...