आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांच्या मृत्यूने गावात हळहळ:खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; जामवाडी शिवारातील घटना

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाल्यामध्ये खेकडे पकडण्यासाठी रात्री गेलेल्या बोरजइ येथील दोन तरुणांचा विजेचा धक्का लागुन मृत्यु झाला. ही घटना दारव्हा मार्गावर असलेल्या जामवाडी ते हेटी मार्गावर असलेल्या नाल्या जवळ मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान घडली. एकाच गावातील दोन तरुणांचा असा अकाली मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.छत्रपती अजाब काळे वय २५ वर्षे व श्रावण लक्ष्मण गार पगारे वय २८ वर्षे दोघेही रा. बोरजइ अशी मृतांची नावे आहेत. छत्रपती आणि श्रावण हे दोघेही जामवाडी ते हेटी मार्गावर असलेल्या नाल्यावर रात्री उशीरा खेकडे पकडण्यासाठी गेले होते.

यावेळी त्या परिसरात असलेल्या दशरथ कालीकार यांच्या शेतात रात्री येणाऱ्या जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी तार बांधुन त्यात विजेचा प्रवाह सोडला होता. या तारेला त्या दोघांचा स्पर्श होवुन त्यांना विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्री गेलेले तरुण परत न आल्याने त्यांच्या नातेवाइकांनी बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळीच त्यांचा शोध सुरू केला. त्यांचा शोध घेतला असता ही बाब उघडकीस आली.कालोकार यांचे शेत हेटी रस्त्याला लागूनच असून, नाल्याच्या दोन्ही बाजूने त्यांचे शेत असल्याने त्यांनी शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी वीजप्रवाह सोडला होता. त्यातच या दोन तरुणांचा मृत्यु झाला. यापैकी छत्रपती हा अविवाहित तर श्रावण हा विवाहित असून, त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. दरम्यान या घटनेची माहिती लाडखेड पोलिसांना देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...