आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी ; केळापूर-पारवा राज्य मार्गावरील घटना

पांढरकवडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी नातेवाईकांकडे मारेगाव येथे दुचाकीने जात असलेल्या युवकाचा अनोळखी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मृत्यु झाला. याच अपघातात दुचाकीवर असलेले इतर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार दि. १ जुन रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास केळापूर- पारवा राज्य मार्गावर असलेल्या पहापळ येथे घडली. मारोती बबन आत्राम वय २८ वर्षे रा. पिंपळशेंडा असे अपघातात मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो तर लक्ष्मण सीताराम मडावी वय २८ वर्षे रा. माहनडोळी ता. केळापूर आणि सतीश नामक रा. लोणी अशी गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकी क्रमांक एमएच २९ एच २५४६ ने केळापूर पारवा राज्य मार्गाने भाडऊमरी वरून मारेगाव तालुक्यातील मोरवा या गावी लग्न सोहळ्यासाठी जात होते. दरम्यान पहापळ गावाजवळ केळापूर कडून भर वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली. हा अपघात इतका भयावह होता की दुचाकीस्वार मारोती आत्राम याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. तर त्याच्या सोबतचे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीला धडक देणारे अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. मारेगाव येथे लग्नसोहळ्यात जाण्याकरता त्यांच्या दुचाकीच्या मागेच इतर पाहुण्यांच्या गाड्या येत होत्या. यावेळी सदर दुचाकीचा अपघात दिसताच दुचाकीस्वारांच्या नातेवाईकाच्या गाड्या थांबल्याने मृताची ओळख पटली. त्यांनी अपघातातील जखमींना तातडीने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...