आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:उभ्या दुचाकीच्या डिकीतून दोन लाख रुपये लंपास

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चापमनवाडी परिसरातील तलाठी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिकीतून दोन लाखाची रोख अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, दि. २२ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी मोहन दहेकर वय ५० वर्ष रा. शिवनगर, उमरसरा यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनूसार, दहेकर हे जिल्हा हिवताप कार्यालयात नोकरीवर असून त्यांची प्लॉट घेण्याच्या उद्देशाने बँक खात्यात पैसे जमा करून ठेवले होते.

अश्यात मंगळवारी त्यांनी वैयक्तीक कामाकरता एचडीएफसी बँकेतून दोन लाखाची रक्कम काढली होती. दरम्यान त्या ठिकाणाहून ते चापमनवाडी परिसरातील तलाठी कार्यालयात आले. त्यानंतर तलाठी कार्यालयासमोर दुचाकी उभी करून त्यांची आपले काम निपटवले. काही वेळातच ते दुचाकीजवळ आले असता, दुचाकीची डिक्कीचे लॉक उघडे दिसले. त्यामूळे त्यांनी डिक्की बघीतली असता त्यातील रोख लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती तातडीने अवधुतवाडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी तलाठी कार्यालय गाठून पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...