आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील घटना:एकाच गावातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता ; पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलींना शाळेतून फूस लावून पळवून नेले. ही खळबळजनक घटना शहरातील विवेकानंद शाळेत गुरूवार, दि. २८ जुलै ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांसह शाळेतील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंद शाळेत यवतमाळ तालुक्यातील एका गावात राहणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी सकाळी गावातील विद्यार्थी वाहनाने शाळेत आले. मात्र, सायंकाळी ६ च्या सुमारास गावात विद्यार्थी घेवून येणाऱ्या वाहनात दोन्ही अल्पवयीन मुली आल्याच नाही. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुटुंबीयांनी तातडीने यवतमाळ गाठून नातेवाईक, शाळा परिसर आणि बसस्थानक परिसर गाठून शोधमोहीम राबविली. मात्र त्या दोघीही कुठेच आढळून आल्या नाही. अखेर कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीने मुलींना फुस लावून पळवून नेल्याबाबत रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हो नोंद केला. या प्रकरणाचा पुढील तपास अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलींना पोलिसांनी आणले
अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवधुतवाडी पोलिसांनी त्या दोन्ही मुलींची शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी दोन्ही मुली अवधुतवाडी पोलिसांना शहरालगत असलेल्या एका गावात मिळून आल्या. घरी वडीलांनी रागावल्याने त्या नातेवाईकांकडे गेले होत्या, अशी कबूली त्या मुलींनी पोलिसांसमोर दिली.

बातम्या आणखी आहेत...