आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या २४ तासांत यवतमाळ शहरासह तालुक्यात दोन मर्डरच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यात पांढरकवडा मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळील गल्लीत तर दुसरी घटना यवतमाळ तालुक्यातील वाघाडी धरण परिसरात घडली. सुनील भीमराव निंबोरे वय ३५ वर्ष रा. येळाबारा असे मृत युवकाचे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेतील मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोन्ही प्रकरणातील मारेकरी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
त्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळील बोळीत शनिवारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, ठाणेदार नंदकुमार पंत यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. यावेळी त्या तरुणाच्या चेहऱ्यावर दगडाने वार केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. वृत्त लिहिपर्यंत त्या तरुणाची ओळखी पटलेली नव्हती तर ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी धडपड सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत असून त्या तरुणाची हत्या ही शुक्रवारी रात्रीच्या सुमारास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तर यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील सुनील निंबोरे रविवारी पत्नीला आणण्याकरता जातो, म्हणून घरून निघून गेले होते. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास वाघाडी धरणात एका युवकाचा पाय तरंगताना नागरिकांना आढळले. घटनेची माहिती नागरिकांनी तातडीने वडगाव जंगल पोलिसांना दिली. त्यावरून पोलिस उपनिरिक्षक भास्कर दरणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाघाडी धरण गाठून पाहणी केली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. यावेळी तो मृतदेह येळाबारा येथील सुनील निंबोरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर मृत सुनील याचा गळा आवळून अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करीत त्याच्या कमरेला ओढणीने आणि नायलॉन दोरीने वजनदार दगड बांधून मृतदेह धरणात फेकण्यात पोलिस तपासात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात अनिल निंबोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.