आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली‎:कोविडचे नव्याने दोन रुग्ण‎ आढळले , 3 जण झाले बरे‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड-१९ चे रुग्ण वाढत‎ असल्यामुळे जिल्हा प्रशासन‎ चांगलेच चिंतेत आहे. अशात‎ मंगळवार, दि. ११ एप्रिल रोजी‎ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह तीन रुग्ण बरे‎ होवून घरी परतले आहेत. तर नव्याने‎ दोन रुग्ण आढळून आले आहे. सध्या‎ १५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.‎ यातील पाच रुग्ण बाहेर जिल्ह्यातील‎ आहेत. तर यवतमाळमधील एक‎ रुग्ण बाहेर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आला‎ आहे.‎जिल्ह्यात सध्या मागिल काही‎ दिवसांपासून दैनंदिन कोविड-१९ चे‎ रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे‎ प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली‎ आहे.

तरीसुद्धा सर्दी, खोकला, ताप‎ आदी रुग्णांची नियमित कोविड‎ चाचणी केल्या जात आहे. मंगळवार,‎ दि. ११ एप्रिल रोजी ४१८ जणांची‎ कोविड चाचणी करण्यात आली.‎ यात ४१६ निगेटीव्ह, तर दोन‎ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.‎ तर तिघे जण बरे होवून घरी परतले‎ आहे. सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह‎ रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली‎ आहे. यात तीन जण होमआयसोलेट‎ आहेत. तर ११ जण रुग्णालयात‎ उपचार घेत असून, एक रुग्ण बाहेर‎ जिल्ह्यात आहे. पॉझिटिव्ह मधील‎ पाच जण बाहेर जिल्ह्यातील रुग्ण‎ आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत‎ ७९ हजार ८०१ रुग्ण पॉझिटिव्ह‎ आढळले असून, ७७ हजार ९८३‎ रुग्ण बरे झाले. कोविडबाधीत एक‎ हजार ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला.‎