आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशस्त्र हल्ला:दुसऱ्या गटातील दोघांना अटक ; शहरातील अमराईपुरा परिसरातील घटना

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अमराईपुरा परिसरात काही दिवसापूर्वी दोन गटात सशस्त्र हल्ला झाला होता. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी तब्बल २८ जणांवर गुन्हे नोंद करून एका गटातील पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सोमवार, दि. १२ सप्टेंबरला दुसऱ्या गटातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज सोलंकी (२०) आणि रितीक सोलंकी (२२) दोघेही रा. अमराईपुरा अशी त्या दोघांची नावे आहेत.शहरातील अमराईपूरा येथे काही दिवसापूर्वी दोन गटातील चांगलीच हाणामारी झाली होती. यात दोन्ही गटातील सदस्य गंभीर जखमी झाले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांवर परस्परविरोधात तक्रारीवरून गुन्हे नोंद केले होते. या प्रकरणातील फरार हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. शुभम जयस्वाल, संकेत संघानी, आकाश संघानी, रवि संघानी, शिवा तिवारी, विशाल दुबे, शत्रु राऊत, मिंट्या ठाकुर, सोनू मुदस्सर, सच्चु यादव, रितेश श्रीवास, आनंद गुप्ता, काका चावरे, प्रदीप पाली, अभी मुराब, आणि पवन शेरे सर्व रा. यवतमाळ अशी एका गटातील तर गोलु सोळंकी, रुतीक सोळंकी, प्रताप सोळंकी, शाम सोळंकी, मोहन सोळंकी, राज सोळंकी व अन्य सहा इसम सर्व रा. अमराईपुरा यवतमाळ अशी दुसऱ्या गटातील हल्लेखोरांची नावे आहे. वीसहून अधिक हल्लेखोर फरारच आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...