आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दुचाकीचा कट मारल्याच्या वादातून दोघांना मारहाण

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लाख रायाजी येथे मोटर सायकलचा कट मारल्याच्या कारणावरून दोघांना मारहाण केल्याची घटना मंगळवार, २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. या प्रकरणी सूरज सुरोशे (४५) यांनी दिग्रस पोलिसांत तक्रार दाखल केली.तक्रारदाराचा पुतण्या सुजल सुरोशे (१८) याला मोटार सायकलचा कट मारून आरोपी जयसिंग राठोड (६०), अरविंद राठोड (३५), मिठु राठोड (४०), गजानन राठोड (२२), सर्व रा. लाख रायाजी वाद करत होते.

हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी सूरज सुरोशे आणि त्याचे वडील गुलाब सुरोशे गेले होते. यावेळी आरोपींनी संगनमत करून काठीने डोक्यावर मारून जखमी केले. गुलाब सुरोशे यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून आरोपीवर विविध सोनुने ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलिस निरीक्षक धर्मराज सोनूने यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...